सांगोला तालुका

कोळा येथे गुरुमुर्ती गणेश मंडळाच्या श्री ची आरती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न.

सांगोला तालुक्यातील कोळा निर्वाण चौकातील गुरुमूर्ती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आरतीचा मान पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली.पो नि. अनंत कुलकर्णी यांचा  शाल श्रीफळ मानाचा फेटा देऊन सत्कार मंडळाचे आधारस्तंभ अक्षय दादा कोपर्डे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी त्यांच्या समवेत मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार जगदीश कुलकर्णी, पोलिस आप्पासाहेब पवार परिसरातील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, गुरुमूर्ती गणेश मंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान मिळाला आनंद झाला मी माझं भाग्य समजतो . कोळ्यासारख्या ग्रामीण भागातील लोक खूप मेहनती आहेत प्रगतीचे नवनवीन शिखरे गाठू शकले आहेत. या भागातील युवक पोलीस एमएसएफ सुरक्षा दलात जास्त प्रमाणात असल्याने मला अभिमान वाटला आता शिक्षण घेत असलेल्या नवीन युवकांनी यांचा आदर्श घ्यावा येणाऱ्या काळात युवकांनी उच्च शिक्षण घ्यावं  यामध्ये वैद्यकीय क्षेत्र इंजिनियर असेल वकील स्पर्धा परीक्षा म्हणून वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये मुलांनी पुढे यावं असे  शेवटी पो नि अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास  रोहित स्वामी, मंडळाचे मार्गदर्शक अक्षय(हरी) कोपर्डे, सारंग पोरे,युवा नेते आकीब भाई पटेल, असलम पटेल, दिगंबर पोरे, दिलीप तोडकरी, सत्यशील उर्फ भोला पोरे, बाळासाहेब कोपर्डे, किसन नकाते, मंगेश पोरे, वासू कोपर्डे, सतीश क्षीरसागर,इंजि वैभव दादा कुलकर्णी, पप्पू तोडकरी, बबलू मुलानी, अनिकेत पोरे,सौरभ महिमकर,आदित्य पोरे, सुहास पोरे,मंगेश पोरे, विजय पोरे,आशुतोष लोटके, अजिंक्य तेली शिवम स्वामी, युवा नेते सौरभ पोरे, विशाल कोपर्डे, यश गायकवाड, ओंकार पोरे, विशाल धूरुपे योगेश धूरुपे, नाना जाधव, अजित पोरे, नागेश स्वामी, आयुष क्षीरसागर, विश्वजीत पोरे यांच्यासह सर्व सभासद मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!