सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

डॉ भारत पाटणकरांच्या उपस्थितीत बुध्देहाळ तलावावरील पाणीवापर संस्थांची कार्यशाळा संपन्न

प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आणि सोपेकॉम संस्थेचा संयुक्त उपक्रम

बुध्देहाळ तलावावरील सर्व पाणी वापर संस्थाच्या प्रतिनिधीसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चोपडीतील बाळासाहेब देसाई विद्यालयात करण्यात आले होते. दोन सत्रामध्ये झालेल्या या शिबिरामध्ये बुध्दीहाळ तलाव लाभशेत्रातील १५ गावातील साठहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सुरवातीला प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष गणेश बाबर यांनी बुध्दीहाळ तलावांमधून होणाऱ्या सिंचनाविषयी सविस्तर माहिती दिली. पाणी वापर संस्थांची सध्याची कार्यपद्धती तसेच येणाऱ्या अडचणी याविषयी सांगितले. सिंचन व्यवस्थेतील त्रुटीमुळे पाण्याचा अपव्यय होतो त्यामुळे बंद पाइप पद्धतीने सिंचनाची गरज बोलून दाखवली. तसेच पाणी वापर संस्थांना देण्यात येणारा परतावा वेळेवर दिला जात नसल्यामुळे काही अडचणी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

                 त्यानंतर सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश, २००५ चा सिंचन व्यवस्थेचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा याविषयी सविस्तर माहिती दिली.  पूर्वीच्या सहकार पद्धतीने असलेल्या पाणी वार संस्था आणि नवीन २००५ च्या कायद्यानुसार असलेल्या संस्था यामधील फरक त्यांनी तुलनात्मक पद्धतीने सादर केला. नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांचे अधिकार अधिक सुरक्षित करण्या आल्याचे तसेच सर्व शेतकऱ्यांना सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. संस्था स्थापन झाल्यानंतर प्रशासनाकडून करणे आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांची पूर्तता याविषयी सखोल मागदर्शन केले.

              जॉय जॉर्ज यांनी महाराष्ट्रातील एकूणच पाणी वापर संस्था आणि त्यांचे यशापयश यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील प्रभिवीपणे कार्यरत असणाऱ्या संस्थांची माहिती त्यानी दिली. प्रभावी सिंचनाबरोबरच पाणी वापर संस्था काय करू शकतात याची माहिती त्यांनी दिली. उपस्थित शेतकऱ्याकडून वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यानी सर्वांचे शंका समाधान केले.

                                सोपेकॉम संस्थेच्या नेहा भडभडे आणि सरिता भगत यांनी पाणी वापर संस्थांना सिंचन व्यवस्थापन करणे सोयीचे व्हावे म्हणून तयार करण्यात आलेल्या इ-पावस अँपविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवले. शेतकरी, पाणी वापर संस्था आणि शिखर संस्था यांच्यातील संवाद प्रभावी करण्याचे कार्य हे अँप करते. शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्राची, पिकाची आवश्यक पाण्याची मागणी नोंद करण्याची सोय या अँपमध्ये आहे. प्रायोगिक तत्वावर बुध्दीहाळ तलाव लाभक्षेत्रातील दोन संस्थांमध्ये घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य सोपेकॉम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी परिसरातील ८ तरुणांना प्रशिक्षण देऊन त्याना मानधनावरती नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

                        प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाने झाला. अतिशय मिश्किल, खुमासदार शैलीत त्यांनी कायद्यातील महत्वाच्या तरतुदी उपस्थितांना अवगत केल्या. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकरी जबाबदार, जागरूक आणि प्रामाणिक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीचोरी रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या शिबारामध्ये प्रगतिशील महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

उमेश लेमटे यांनी आभारप्रदर्शन करून प्रशिक्षण शिबिराचा समारोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!