नीरा उजवा कालव्याचे पाणी कासाळ ओढयातून खेडभाळवणी पर्यंत सोडण्यात यावे व तिसंगी तलाव, चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावे –  मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

 *कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांच्याकडे केली आग्रही मागणी* *श्री.कपोले यांचा सकारात्मक प्रतिसाद…..
 देवधर, वीर व भाटगर धारण क्षेत्रात चांगल पाऊस झाला असल्याने ही तीनही धरणे शंभर टक्के  पाण्याने भरली आहेत.त्यामुळे मैल ९३ ला या धरणातून  ४०० ते ४५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडून  निरा उजवा कालव्यातून चिकमहुद ता. सांगोला येथून कासाळ ओढ्यामधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडून ते पाणी खेडभाळवणी ता.पंढरपूर पर्यंत पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावे.तसेच सांगोला तालुक्यातील चिंचोली व पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा अशी मागणी मा.आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महांडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांचेकडे केली असून त्यांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मा.आमदार साळुंखे – पाटील यांनी दिली.
नीरा उजवा कालव्याच्या सांगोला व पंढरपूर कार्यक्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाल्याने या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे  . सध्या देवधर, वीर व भाटगर ही तीनही धरणे शंभर टक्के  पाण्याने भरले असल्याने मैल ९३ ला त्या धरणातून पूर्ण क्षमतेने ( ४०० ते ४५० क्विसेसने )पाण्याचा विसर्ग करून  निरा उजवा कालव्यातून चिकमहुद ता. सांगोला येथून कासाळ ओढ्यामधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडून ते पाणी खेडभाळवणी ता.पंढरपूर पर्यंत पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावे. त्यामुळे महूद, गार्डी, पळशी, सुफली,उपरी, शेळवे, भंडीशेगाव व खेडभाळवणी या सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या भाळवणी गटातील या गावांचा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे तसेच आत्तापर्यंत सोनके तिसंगी तलाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने,आंदोलने,उपोषणे अशा अनेक विविध मार्गातून तलावामध्ये पाणी सोडून भरून द्यावे यासाठी आग्रही मागणी केली होती त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून सोनके तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा. याचबरोबर सांगोला तालुक्यामध्ये येणारा चिंचोली तलाव हा ही पूर्णपणे कोरडा पडलेला आहे तोही पूर्ण क्षमतेने भरून दिल्यानंतर   सांगोला,चिंचोली,बामणी, एखतपुरचा पुर्व भाग याच्यासह अनेक गावे ओलिताखाली येऊन नागरिकांचा पिण्याच्या,शेतीचा व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे. निरा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी पूर्णपणे सीना नदीमध्ये वाहून जात आहे ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन ४०० ते ४५० क्विसेसने पूर्ण क्षमतेने पाणी मागणीप्रमाणे सोडून या तिन्ही ठिकाणी भरून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला आदेश द्यावेत अशी मागणी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कपोले यांच्याकडे केली आहे. या मागणीला श्री.कपोले यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या आग्रही मागणीला निश्चित यश येईल अशी अशा वाटल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button