कोळा येथील दीपक आबा सायन्स कॉलेज व महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश…

सांगोला तालुक्यातील कोळा येथील डॉ पतंगराव कदम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेजचे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोडनिंब येथे सोलापूर जिल्हास्तरीय बॉक्सिंग व क्रीडा स्पर्धेत विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे संस्थेच्या यशस्वी कार्याचे सर्वसामान्य लोकांमधून कौतुक होत असून यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक दीपकराव माने सचिव अमोल माने संचालक शरद माने यांनी अभिनंदन केले आहे.
मोडनिंब येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षीय गटातून ४६ ते ४९ वजनी गटात प्रथम क्रमांक जुनोनी गावचे अमोल बंडू शेळके, ५६ ते ६० वजनी गटात जुनोनी गावचे प्रथम क्रमांक प्रवीण नारायण होनमाने,मुलींमध्ये ६९ ते ७५ वजनी गटात प्रथम क्रमांक कोळा गावची कन्या प्रज्योती प्रकाश माने,६० ते ६४ वजनी गटात डोंगर पाचेगावची कन्या प्रथम क्रमांक प्रगती समाधान नीलकंठ या विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे संस्थेचे नाव मोठे केले आहे या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच बॉक्सिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेले अविनाश नवनाथ जाधव, महेश रामचंद्र शिंगाडे, राजकुमार कंदगल, स्वाती चंद्रकांत पुकळे यांनीही यश संपादन केले आहे. यशस्वी खेळाडूंना काशिलिंग होनमाने सर, प्राचार्य प्रकाश आलदर यांच्यासह अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.