महाराष्ट्र

नाझरे येथे मोहरम उत्साहात साजरा

नाझरे ता. सांगोला येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेने गावात तीन ठिकाणी ताबूतची स्थापना करण्यात आली होती, तसेच पांढरीचा ताबूत हा प्रसिद्ध आहे.
इस्लामिक वर्षाची सुरुवात मोहरम या महिन्याने होते. मोहरम ला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे. कारण आज पासून १३३८ वर्षांपूर्वी मोहरमच्या दहा तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसैन यांनी इस्लाम वाचवण्यासाठी स्वतः व आपल्या ७२ अनुयायाचे बलिदान दिले व त्या बलिदानाची आठवण म्हणून मोहरम साजरा केला जातो. व हा उत्सव नाझरे येथे मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने हिंदू.. मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात.
शनिवार दि. पाच जुलै रोजी गावातील सर्व समाज हिंदू मुस्लिम बांधवांनी व इतर समाज बांधवांनी मलिदाचा नैवेद्य ताबूत, पिराना दाखवण्यात आला. तसेच ताबूतची मिरवणूक व सवारीची मिरवणूक व भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मुस्लिम बांधवा तर्फे भाविकांना सरबत प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button