सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात शाखा कार्यालय व कार्पोरेट ऑफिस उद्घाटनाकरिता सज्ज

सांगोला (प्रतिनिधी):- एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सांगोला शाखेचा व कार्पोरेट ऑफिसचा लोकार्पण सोहळा आज दुपारी दोन वाजता नेहरू चौक सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागातील नेहरू चौक परिसरामध्ये खरेदी विक्री संघाच्या कार्यालय शेजारी या मल्टीस्टेटची शाखा व कार्पोरेट ऑफिस उद्घाटनाकरिता सज्ज झाले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मंगळवेढा ,जयसिंगपूर , आंधळगाव, हंगींरगे, दिघंची, भोसे , सोलापूर ,भाळवणी ,वेळापूर, डफळापुर ,ढालगाव ,कामती , करकंब आणि करगणी अशा सुमारे 15 शाखांच्या माध्यमातून ही संस्था ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून ठेवीदारांचा विश्वास , सभासदांचे हित आणि ग्राहकांच्या सुविधा याकडेच संस्थेने आपले सर्व लक्ष केंद्रित केलेले आहे. या मल्टीस्टेट कडून सुरू असलेल्या आकर्षक योजना — एलकेपी कन्यादान ठेव योजना. यामध्ये एक लाख 11 हजार रुपये एकदाच गुंतवल्यास अठरा वर्षानंतर मुलीच्या भवितव्यासाठी तब्बल दहा लाख रुपये प्राप्त होणार आहेत. एलकेपी मासिक ठेव योजना– यामध्ये तेरा महिन्यांकरिता एक लाख रुपये गुंतवल्यास दरमहा एक हजार रुपये प्राप्त होणार आहेत. एलकेपी पेन्शन योजना– ही योजना साधारण 36 महिन्यांची असून ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत लाभदायी ठरणारी आहे. याशिवाय झिरो बॅलन्स बचत खाते, विज बिल भरणा ,फोन बिल, विमा भरणा , डेली कलेक्शन सुविधा सोनेतारण कर्ज योजना, एसएमएस व मोबाईल ॲप सुविधा ,महिला बचत गट योजना व कर्ज सुविधा , व्यावसायिक कर्ज सुविधा, चेक क्लिअरन्स ची सोय, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची सोय, सेविंग ,करंट आणि पिग्मी खाते अशा कितीतरी प्रकारच्या सुविधा या मल्टीस्टेटच्या माध्यमातून देऊ केलेल्या आहेत. इथे नांदते लक्ष्मी ….देते विश्वासाची हमी….. हे ब्रीद घेऊन संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, संचालक डॉ.बंडोपंत लवटे व जगन्नाथ भगत गुरुजी यांनी गेल्या अनेक वर्षापासूनचा सहकाराचा अनुभव सोबत घेऊन या मल्टीस्टेटच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण विभाग विशेषतः मुंबई परिसर त्याचबरोबर कर्नाटक राज्य असे मोठे कार्यक्षेत्र निश्चित करून अनेक शाखांच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एलकेपी मल्टीस्टेटचे कार्पोरेट ऑफिस सांगोल्यात होत असल्यामुळे आज संपन्न होणार्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.