सांगोला तालुकाराजकीय

यापुढे दिपकआबांवर अन्याय झाल्यास सहन करणार नाही ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात कार्यकर्त्यांचा निर्धार 

युती आघाडीचा धर्म पाळतांना कार्यकर्त्यांचा प्रचंड संच असूनही सांगोला विधानसभा मतदारसंघात सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सारख्या गुणी नेत्यावर पक्षाकडून अन्याय झाला. तरी, दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कधीच कसलीही तक्रार न करता प्रामाणिकपणे पक्षवाढीचे काम केले. मात्र यापुढील काळात दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर अन्याय झाल्यास तो आम्ही सहन करणार नाही असा निर्धार सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविवार दि. ११ रोजी मंथन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास स्व. आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड लतिफ तांबोळी उद्योग व्यवसाय सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित मंथन शिबिर वेध भविष्याचा या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिबिरात आगामी काळात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नजरेतील महाराष्ट्र साकारणार असल्याचा एकमुखी निर्धार या शिबिरातून करण्यात आला. खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
शिर्डी जि. अहमदनगर येथील पक्षाच्या शिबिरानंतर प्रत्येक मतदार संघात पक्षाचे मंथन वेध भविष्याचा हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सांगोला येथे आयोजित शिबिरात मार्गदर्शन करतांना पक्षाचे जेष्ठ नेते बळीराम साठे म्हणाले, सांगोला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. दिपकआबा आणि जयमालाताई गायकवाड या बहीणभावांनी सत्ता असो किंवा नसो तालुक्यात असणारी ताकद कायम ठेवली आहे. पक्षाने जिल्ह्यात आजवर आयोजित केलेल्या सर्व शिबिरात सांगोला येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आता जेंव्हा आपण पवार साहेबांची भेट घेऊ तेंव्हा सर्वात प्रथम अनेक वर्षांपासून उपेक्षित असणाऱ्या दिपकआबांना न्याय देण्याची विनंती करणार आहोत. आबांची सांगोला तालुक्यातील राजकीय ताकद त्यांचा अनुभव आणि काम करण्याची तळमळ पाहता अशा सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्याची विनंती प्राधान्याने नेतृत्वाकडे आपण करू असेही शेवटी बळीराम काका साठे म्हणाले
पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ यंत्रणा सक्षमकरणावर भर द्यावा असे आवाहन उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना केले. तसेच सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा घणाघात केला. सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने आणि विश्वासाने करणाऱ्या दिपकआबांना यापुढील काळात न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहू असेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी नागेश फाटे, लतिफ तांबोळी, जयमालाताई गायकवाड, डॉ.पियुष साळुंखे पाटील, पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे, शिवाजी कोळेकर, संभाजी हरिहर, प्रसाद लोखंडे, जयश्री सावंत, अश्विनी माने, नवनाथ मोरे यांनी आपले विचार मांडले. या शिबिरास जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, शिवाजी बंडगर, अनिल नाना खटकाळे, माजी सभापती अनिल मोटे, शिवाजी नाना बनकर, सखुबाई वाघमारे, शुभांगी पाटील, अमोल सुरवसे, सुयश बिनवडे, रवी चौगुले, शोएब इनामदार आदींसह सांगोला शहर व तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१) सामान्य लोकांचा विश्वास हेच आपले भांडवल…!
स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांची जनसेवेची परंपरा आहे. सत्ता किंवा पद असो नसो सामान्य लोकांची सेवा करणे हे आपल्या रक्तात आहे. आजपर्यंत कधीच मनात कोणताही स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. सत्ता असो किंवा नसो येथील सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आहेत. सामान्य लोकांचा माझ्यावर आणि साळुंखे पाटील परिवारावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल आहे. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांची सेवा करेन.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
दिपकआबासारखे नेतृत्व पुढे येणे ही काळाची गरज 
स्व. आर आर आबा पाटील आणि मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे सख्ख्या भावासारखे सबंध होते. त्यामुळे मी आबांना कुटुंबातील एक वडीलधारी म्हणूनच पाहतो. लहानपणापासून मी आबांची काम करण्याची पद्धत पाहतोय. सांगोला तालुक्यातील अनेक गावांचे कवठे महांकाळ तालुक्याशी जवळचे संबंध आहेत. सत्ता असो किंवा नसो आबासारखा लोकांचे काम करणारा नेता मी पहिला नाही. त्यांनी कधीच जात धर्म किंवा पक्षभेद मानला नाही. मोठ्या मनाने जो माणूस पुढे येईल त्याचे प्राधान्याने काम करणे हीच त्यांची संस्कृती आहे. मला कवठे महांकाळ पेक्षा सांगोला तालुक्यात जास्त लक्ष द्यावे लागले किंवा कष्ट घ्यावे लागले तरी माझी तयारी आहे, मात्र दिपकआबा सारखे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व पुढे येणे हीच खरी गरज आहे.
रोहित आर.आर. पाटील
युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!