सांगोला तालुका

सांगोला अर्बन बँकेचा “ग्राहक साक्षरता मेळावा” ग्राहक, सभासद व ठेवीदार यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न…

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि. सांगोला या बँकेचा ग्राहक साक्षरता मेळावा दि. १०/१२/२०२२ रोजी सायं. ५.३० वा. ग्राहक ठेवीदार, सभासद, हितचिंतक, कर्मचारी यांच्या उत्स्फुत उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे निवृत्त मॅनेजर श्री. अविनाश जोशी व दापोली अर्बन चे चेअरमन श्री जयवंत जालगांवकर हे उपस्थित होते.
सांगोला अर्बन बँकेने गेली २५ वर्ष आपले ग्राहक, ठेवीदार व सभासद यांच्या विश्वासास पात्र राहून, व्यवहारातील पारदर्शकता जपत यशस्वी रौप्य महोत्सवी वर्षांपर्यंत वाटचाल केली आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले श्री. अविनाश जोशी यांनी ग्राहक कसा असावा व तो कसा ओळखावा (KYC) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकांची व सभासदांची जबाबदारी काय असते याबाबत मोलाचा सल्ला दिला. दापोली अर्बन चे चेअरमन श्री. जयवंत जालगांवकर यांनी सहकारी बँकेबाबतच्या रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेच्या कर्जदार व जामीनदार यांची जबाबदारी काय असते ? थकीत कर्जाची वसुली कोणत्या पध्दतीने करावी ? तारण मालमत्ता, सोनेतारण, जामीनदा होताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे सध्याचे शासनाचे धोरण इ. बाबींवर महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितीत असणान्या सभासद व ग्राहकांना त्यांच्या अडचणी, शंका व प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावेळी श्री. बशीरभाई तांबोळी, अरविंद डोंबे, प्रा. रंगनाथ गोडसे, अरविंद येलपेले, प्रा. विष्णू गोडसे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या असणान्या शंका व प्रश्नांचे निराकरण केले. यावेळी उपस्थित असणारे सांगोला तालुका उ.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांनी सहकार क्षेत्र व त्यामधील उणीवा याबाबत मार्गदर्शन करुन बँकेच्या वाटचालीच शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे तज्ञ संचालक सीए. के. एस. माळी यांनी बँकेची सध्याची परिस्थिती व भविष्यातील वाटचाल तसेचबँकेचे कामकाज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर आपण कोणत्याप्रकारे मात करु शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी बँकेचे कर्जदार व थकबाकीदार यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून बँकेस सहकार्य करावे तसेच आपले कर्जखाते एन.पी.ए. (NPA) मध्ये जाऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी व प्रत्येकाने आपले व आपल्या कुटूंबातील सदस्याचे बचत खाते उघडून त्यांचे बँकेशी असणारे नाते अधिक दृढ करावे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ. योजना मोहिते व प्रा. संतोष पवार या खातेदारांनी बँकेविषयी त्यांचे असणारे नाते व त्याचे बँकेबददल, चेअरमन, सर्व संचालक यांच्याबददलचे वयैक्तिक अनुभव सांगितले. यावेळी उपस्थित सभासद व ग्राहक यांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बँकेचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व्हा. चेअरमन राजन चोथे, तज्ञ संचालक सीए. के. एस. माळी, संचालक विष्णू लांडगे, मारुती बनकर, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देशमुख, शिवाजीराव गायकडवाड, सुरेश माळी, शहाजीराव नलवडे, सुहास यादव, गोविंद माळी, संजय खडतरे, सौ. उषा आदाटे, डॉ. संगिता पिसे, सीए. संतोष बालटे, इंजि. सुरेश पाटील, अॅड. चैत्रजा बनकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश ढमढेरे इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांचे बँकेच्या वतीने स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश ढमढेरे यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्याची विनंती केली. या कार्यक्रामाची प्रस्तावना व मनोगत बँकेचे तज्ञ संचालक सीए. के. एस. माळी यांनी केले तर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर माळी सर यांनी केले तसेच कार्यक्रमास उपस्थित चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळा, प्रमुख पाहूणे व सर्वांचे आभार बँकेचे संचालक मा. श्री. शिवाजीराव गायकवाड यांनी केले.. यावेळी कार्यक्रम पार पाडण्यासाठी बँकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!