सांगोला अर्बन बँकेच्या व्यवस्थापन मंडळ (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) समितीच्या चेअरमनपदी सीए. के. एस. माळी यांची निवड

सांगोला ( प्रतिनिधी):- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. ३१/१२/२०१९ च्या परिपत्रकानुसार व रिझर्व्ह बँक यांच्या मान्यतेनुसार बँकेच्या व्यवस्थापन समितीची (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) पहिली सभा दि. १०/१२/२०२२ रोजी बोलाविण्यात आली होती. त्यावेळी सीए. के. एस. माळी यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या व्यवस्थापन मंडळात सीए. के. एस. माळी याच्याशिवाय श्री. शिवाजीराव गायकवाड,सीए. संतोष बालटे, इंजि. सुरेश पाटील, अॅड. चैत्रजा बनकर यांच्या नियुक्तीस रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळालेली आहे.
रिझर्व्ह बँकेचा बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापनेचा उददेश ठेवीदाराच्या हिताच्या रक्षणासाठी व व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी तसेच अनुभवी सदस्यांचा सहभाग वाढविण्यासाठी व त्याचबरोबर बँकेचे अंतर्गत नियंत्रण करणे व त्याव्दारे संचालक मंडळास कर्जे, ऑडीट तपासणी, एनपीए कर्जखाती व अंतर्गत व्यवस्थापन याबाबत संचालक मंडळास योग्य तो सल्ला देणे जेणेकरून संचालक मंडळास योग्य तो निर्णय घेता येईल यासाठी रिझर्व्ह बँकेने हे धोरण बनवले आहे. या धोरणानुसार कर्जप्रस्ताव संचालक मंडळ व कर्ज समितीस शिफारस करणे, एनपीए कर्जखात्याबाबत वसुली कारवाई करणेबाबत सल्ला देणे, एकरकमी कर्ज परफेड योजना, निधी व्यवस्थापन व निधी गुंतवणुक, रिस्क व्यवस्थापन, बँकेचे संगणकीकरण, लेखापरिक्षण, पालक व ग्राहक तक्रार निवारण इ. कार्ये या व्यवस्थापन मंडळास करावयाची आहेत. यावेळी सर्व नुतन चेअरमन व समिती सदस्यांचा सत्कार बँकेचे चेअरमन- डॉ. प्रभाकर माळी, व्हा. चेअरमन- राजन चोथे, संचालक विष्णू लांडगे, मारुती नकर, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देशमुख, सुरेश माळी, शहाजीराव नलवडे, सुहास यादव, गोविंद माळी, संजय खडतरे, सौ. उषा आदाटे, डॉ. संगिता पिसे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश ढमढेरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.