सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या वतीने पालकांसाठी कार्यशाळा संपन्न….
पालकत्व हे सुजाण असाव-प्राचार्या इंदिरा पाटील

पालकांनी मुलांचा कल ओळखावा आणि त्यांना ज्या गोष्टीत आवड आहे त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आपली मुले कोणाच्या संगतीत असतात याकडे लक्ष द्यावे. पालकत्व हे सुजाण असले पाहिजे असे प्रतिपादन एम.टी.एस.ई स्कूल, सांगलीच्या प्राचार्य इंदिरा पाटील यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या वतीने कविराज मंगल कार्यालय सांगोला येथे इ.1ली ते 10वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे यांच्या हस्ते सौ.इंदिरा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरूवात सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने झाली.प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. दिपाली बसवदे मॅडम यांनी करून दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पालकत्व ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पालकांचे मुलांसोबत मित्रत्वाचे वर्तन असावे.आपल्या मुलांवर दडपण न आणता त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे त्यांना पुस्तक वाचनाची सवय लावावी तसेच पालकांनी मुलांच्या भावनांचा आदर करावा. हे सांगताना सी.बी.एस.ई अभ्यासक्रम दर्जेदार असून बौध्दिक क्षमता वाढवणारा आहे हे सांगून या अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाबद्दल उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असलेबद्दल विद्यालयाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रामाचे सूत्रसंचालन कु. दिपाली बसवदे यांनी केले तर आभार अनुपमा गुळमिरे व कु. लता देवळे यांनी मानले.