सांगोला तालुकाक्राईम

मोटार सायकल व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास सांगोला पोलीसांना यश

सुमारे ३,१२,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत

सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विक्री बाजारमधुन ब-याच प्रमाणावर मोटार सायकली व मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशंगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र. नं. ९०२ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीता असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सांगोला शहरातील तीन इसम विनाकागदपत्राची मोटार सायकली विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर तीन इसमाना यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातुन दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडून यमाहा कंपनीची व शाईन कंपनीच्या ४५०००/- रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.

तसेच सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विकी बाजारमधुन ब-याच प्रमाणावर मोटार सायकली व मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे कडील पोलीसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरुन असे निर्देशनास आले की मोठया प्रमाणावर मोबाईल हे सातारा, सांगली व सोलापूर या तीन जिल्हयामध्ये आढळून येत असल्याने त्यावरून पोलीस निरिक्षक, सांगोला पोलीस ठाणे यांनी पथक नेमुण तपास केला आहे. तरी सदर पथकाने विविध जिल्हयातुन सांगोला पोलीस ठाणे हददीतील चोरीस व गहाळ झालेले एकुण १७ रियलमी, वनप्लस, सॅमसंग, विवो, ओप्पा अशा विविध कंपनीचे महागडे मोबाईल हस्तगत केले असुन त्यांची एकुण किंमत सुमारे २,६७,०००/- रुपये असुन ते तक्रारदार यांना सर्व प्रक्रिया करून परत देण्यात येणार आहेत.

आठवडी बाजार व जनावरांचा बाजार यामध्ये पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असून पोलीस ठाणे हददीत सांगोला, महुद, कोळा, जुनोनी बाजारात सुदधा गस्त व वेगवेगळ्या ठिकाणी रात्रगस्त, नाकाबंदी नेमण्यात येते यामुळे गत महिन्यात मोबाईल व मोटार सायकली चोरीच्या घटनाना मोठया प्रमाणात आळा बसला असुन यापुढे ही आठवडा बाजार प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस निरिक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.

सदर मोबाईल व मोटार सायकली हस्तगत करण्याची कामगिरी श्री. शिरीष सरदेशपांडे साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. हिंमतराव जाधव सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विक्रम गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोनि श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. बाबासाहेब पाटील, पोकॉ. लक्ष्मण वाघमोडे, पोकों. सिद्धलिंग बिराजदार, पोकों. निशांत सावंजी तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ युसूफ पठाण यांनी मदत करून सदर चोरी व गहाळ झालेले मोबाईल व मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!