सांगोला तालुका

*सांगोले नगपरिषद अंतर्गत शहर उपजीविका केंद्राचे मा.आमदार श्री.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते उदघाटन*  

सांगोला: दि.०७/०७/२०२३ सांगोला नगरपरिषद अंतर्गत बचत गटातील महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ म्हणून नगरपरिषद कार्यालय येथील “सोनचीरीया” या शहर उपजीविका केंद्राचे उदघाटन मा.आमदार श्री.शहाजीबापू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळेस मा.तहसिलदारसो श्री.संजय खडतरे, मा.मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, माजी नगरसेविका श्रीम.स्वातीताई मगर, श्रीम.छायाताई मेटकरी, श्रीम.अप्सराताई ठोकळे, शहरस्तर संघ  अध्यक्षा श्रीम. सुनंदा घोंगडे व नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी  बोलताना मा.आमदार श्री.शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपरिषद मार्फत सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून बचत गटातील तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने मा.मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच सांगोला शहरातील व परिसरातील सर्व बचत गटांच्या व्यवसाय वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.सुधीर गवळी,मुख्याधिकारी यांनी सांगोला शहरामध्ये बचत गटाचे मोठे काम उभे  झाले असून बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना शहरामध्ये एक व्यासपीठ मिळण्याच्या करिता शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. 
सदर केंद्रांतर्गत सांगोला शहरातील नागरिकांना शहरीतील विविध व्यावसायिकांची,शासकीय योजना, कारागीर (सुतार,नळजोडणी करणारे, इलेक्ट्रिशीयन ई) यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.  यावेळी सांगोला शहरातील विविध बचत गटातील सुमारे ३५० हून अधिक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सविता लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीम. मनीषा हुंडेकरी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधिक्षक श्रीम.तृप्ती रसाळ, सहा.प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे,बिराप्पा हाके, शरद थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नगरपरिषद सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!