सांगोला तालुका

श्री.संजय गळवे यांना आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार  प्रदान

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री.संजय गळवे यांना रयत शिक्षण संस्थेचा यंदाचा “आदर्श विज्ञान शिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री.संजय गळवे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये गेल्या 16 वर्षापासून विज्ञान शिक्षक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विविध प्रकारच्या बाह्य परीक्षा (NMMS,RTS,स्कॉलरशिप,कर्मवीर विद्याप्रबोधिनी),विज्ञान प्रदर्शन,रयत विज्ञान परिषद,शेती विषयक फाली उपक्रम, शिक्षण संक्रमण लेखन,रयत विज्ञान पत्रिका लेखन, शोध निबंध इत्यादी.गोष्टीमध्ये संजय गळवे यांनी भरीव योगदान दिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,सारोळा कासार ता.जि.अहमदनगर या विद्यालयात राबवलेला वाचन कोपरा हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय बाब आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 4 ऑक्टोंबर 2023 रोजी समाधी परिसर सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार श्री.संजय गळवे यांना देण्यात आला. श्री.संजय गळवे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी,सचिव मा. विकास देशमुख,संघटक मा.  डॉ.अनिल पाटील,माध्य.सहसचिव मा. बंडू पवार,विभागीय अधिकारी मा. राजेंद्र साळुंखे तसेच नरळेवाडी गावी पोलिसपाटील मा.नानासाहेब वाळखिंडे,धनाजी नरळे सर, बाळासाहेब गळवे,शरद गळवे,महादेव गळवे,दादासाहेब गळवे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!