सांगोला विद्यामंदिरच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची सांगोला अर्बन बँकेस अभ्यास भेट संपन्न

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील इ.११ वीच्या वाणिज्य शाखेमधील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील माहितीचा व व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा व सध्याच्या आधुनिक बँकिंग क्षेत्रासंबंधी अद्ययावत माहिती मिळावी यासाठी सांगोला येथील प्रसिद्ध सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यालयाला नुकतीच अभ्यास भेट संपन्न झाली.

यावेळी ज्युनिअर कॉलेज मधील वाणिज्य शाखेचे जवळपास शंभर विद्यार्थी उपस्थित होते.प्रथम बँकेचे H.R. मा.आनंद शिवगुंडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बँकेतील कर्मचारी प्रत्यक्ष खातेदारांशी व्यवहार कसे करतात,त्याठिकाणी प्रत्यक्ष व्यवहार दाखवले,तसेच बँकेच्या रेकॉर्ड रूम विषयी माहिती देण्यात आली.यानंतर सांगोला अर्बन को‌.ऑफ बँकेच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री.तानाजी पवार यांनी बँकेमध्ये होणाऱ्या विविध व्यवहारांविषयी तसेच बँकेत खाते उघडणे,चलने, पासबुक,चेक बुक इत्यादी संबंधी माहिती दिली,तर बँकेचे सीईओ मा.सुभाष वेळापुरे साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधत विद्यार्थ्यांना आधुनिक बँकिंग प्रणाली विषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांना उत्तरे देत आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या शंका मांडल्या तसेच त्याचे निरसन करून घेतले.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  गंगाधर घोंगडे ,उपप्राचार्य सौ. शहिदा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभ्यास भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना या अभ्यास भेटीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी,तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ,शाखाधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रा.कु. विजया फुले,बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.प्रसाद खडतरे,प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले तर प्रा.सौ.सुवर्णा लवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa