*पायोनियर शैक्षणिक संकुल य.मंगेवाडी मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*

आज संस्कृतीचा, स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा सोहळा पायोनियर शैक्षणिक संकुल, य.मंगेवाडी मध्ये १ मे महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिन म्हणजेच आपल्या राज्याची स्थापना आणि राज्याच्या ऐतिहासिक शौर्याचा उत्सव. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि तो दिवस प्रत्येक महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संभाजी पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. याशिवाय पायोनियर पब्लिक स्कूल CBSE चे प्राचार्य श्री. सतीश देवमारे सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर, तसेच विभागप्रमुख श्री. रुपनर सर, बाबर सर, राऊत मॅडम, आणि येलपले मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर पायोनियरची विद्यार्थिनी प्रणिती पवार हिने मराठा वीरांच्या शौर्याचा उजाळा देणारे प्रभावी भाषण केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायोनियर पब्लिक स्कूल CBSE च्या अकॅडेमिक इंचार्ज श्रीमती मृणाल राऊत मॅडम यांनी पार पाडले. तसेच, आभार प्रदर्शन पायोनियर निवासी गुरुकुलचे सोमनाथ आदलिंगे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता, आणि सर्वांनी “जय महाराष्ट्र” च्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारावून टाकले.



