सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

डॉ.अनिकेत देशमुख यांनी आयोजीत केलेले कृषी प्रदर्शन ठरत आहे शेतकर्‍यांना पर्वणीच

सांगोला(प्रतिनिधी):-डॉ.अनिकेत देशमुख युवा मंचच्यावतीने स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजीत गणेशरत्न कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे दिसून येत असून स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू व लोकप्रिय युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी आयोजीत केलेले कृषी प्रदर्शन सांगोला तालुक्यासह मंगळवेढा, आटपाडी, मंगळवेढा, पंढरपूर, या तालुक्यातील शेतकरी बांधवांना पर्वणीच ठरत आहे. 
या प्रदर्शनात 170 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी झाल्या आहेत.या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि त्यामधून निर्माण होणार्‍या संधींची माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कृषीप्रदर्शनाला शेतकर्‍यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे प्रदर्शन 22 जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.
शेतकरी शेतीची विविध प्रात्याक्षिके पाहून प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये महिला शेतकर्‍यांची संख्या लक्षणीय दिसून आली, हे विशेष होय.आपल्याला जे शाश्वत शेतीसाठी उपयोगी पडते, त्याची माहिती घेत अनेक शेतकर्‍यांनी आजचा दिवस शेती ज्ञानासाठी वापल्याचे दिसून आले. स्वयंस्फूर्तीने आलेल्या या शेतकर्‍यांनी शेतीची विविध प्रात्याक्षिके व यांत्रिक अवजारे व यांत्रिकी अवजारे पाहण्यास पसंती दिली. बहुतांशी शेतकरी हे आपल्या कुटुंबासमवेत आले होते. शेतीत नवे काहीतरी करू पाहणारे युवा उद्योजक गर्दी करताना दिसून आले.
शेतीतील समस्या सातत्याने येत राहतात, अर्थात या समस्यांवर मात करण्याचा मार्ग खरेतर प्रदर्शनात येऊन सापडला  दूरदृष्टीने शेती करण्यासाठी व नव्या कृषी संस्कृतीची,  कृषी क्रांतीची दिशा शोधण्यासाठी डॉ.अनिकेत देशमुख यांनी आयोजित केलेला यंदाचा गणेशरत्न कृषी महोत्सव आमच्यासाठी फायद्याचा ठरलेला आहे, अशा भावना कृषी प्रदर्शनास भेट देणार्‍या शेतकर्‍यांमधून होऊ लागली आहे.
आम्ही घरच्या महिलांना आणले आहे, जेणे करून नवे तंत्र महिला शेतकरी खूप लवकर आत्मसात करतात. सहाजिकच त्याचा ज्ञानाचा उपयोग प्रयोगशील शेती करण्यासाठी फायद्याचे ठरते. डॉ.अनिकेत देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामुळे आमच्या ज्ञानात मोठी भर पडली असून त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहचले असल्याच्या भावना शेतकरी बोलून दाखवित आहेत.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!