आई-वडिलांची सेवा करा तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ह भ प विठ्ठल महाराज माने

आई-वडिलांची सेवा करा तसेच पंढरपूरची एक वारी केली तर तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनाला आकार देण्याचे काम आपल्या आई-वडिलांनी केलं आहे. तुमचे जीवन सुखी समृद्ध करण्याचे सामर्थ्य फक्त अध्यात्मकात आहे. असे मौलिक विचार ह.भ.प.विठ्ठल महाराज माने आचेगाव (माजी पोलीस निरीक्षक) यांनी जवळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवात व्यक्त केले.
पुढे बोलताना ह.भ.प.विठ्ठल महाराज माने म्हणाले जीवनाला आकार देण्यात काम अध्यात्म करते अध्यात्मकाची जीवनाला सांगड लागली की जीवन सुखी समृद्ध होते. म्हणून अध्यात्म ज्याला कळलं त्याच्या जीवनाच सोनं झालं. माणसाला आयुष्य जगत असताना चांगले अनुभव कमी पण वाईट अनुभव जास्त येतात. संत तुकाराम महाराज म्हणतात’ तुका म्हणे झाले पतंगा धागा अवरा पांडुरंगा’स्व.काकींनी सुरू केलेल्या सप्ताह सोहळ्याचे कौतुक करताना महाराज म्हणाले जवळे गावात सूर्य चंद्र असेपर्यंत काकींचे नाव कायम अजरामर राहणार आहे.असे सांगत महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना श्रवणीय कीर्तनाचा आनंद दिला.
या कीर्तनामध्ये गायक,मृदंगमणी,टाळकरी, विण्याचे सेवेकरी चोपदार यांची मोलाची साथ लाभली. तत्पूर्वी पहाटे काकडा सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन सायंकाळी प्रवचन व हरिपाठ हे कार्यक्रम संपन्न झाले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी श्री.चंद्रकांत सुतार, श्री.दीपक चव्हाण, श्री.रमेशआप्पा साळुंखे,श्री.पिंटू मधुरे यांनी परिश्रम घेतले.