महाराष्ट्र
बुंजकरवस्ती शाळेचा मानाचा तुरा डॉ. भाई गणपत देशमुख साहेब यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेत प्रथम क्रमांक

डॉ. भाई गणपत देशमुख साहेब यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुंजकरवस्ती येथील कु. रुखया हुसेन सुतार हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला.
तिला श्रीमती सारिका सुभाष गवसने व श्रीमती स्मिता दिपक शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व शाळेची प्रगती पाहून कौतुक व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
.



