महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनचा मेळावा सांगोला येथे युनियनचे राज्याध्यक्ष मोहन लामकाने प्रदेश सरचिटणीस दिलीप जाधव जिल्हा उपाध्यक्ष अमोल मोरे जिल्हा सचिव बालाजी पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडीअडचणी बाबत आढावा घेण्यात ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर कर्मचा-यांचे प्रश्न व शासनाने घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत त्यामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून यासाठी कर्मचाऱ्यांची एकजूट महत्वाची आहे महत्वाचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटले जाणार नाहीत म्हणूनच एकत्र येऊन संघटना मजबूत करावी असे आवाहान राज्याध्यक्ष मोहन लामकाने यांनी केले तसेच जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस जाधव यांनी देखील कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले
यावेळी सांगोला तालुक्याच्या कार्यकारणीची निवड खालील प्रमाणे करण्यात आली युनियनच्या तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण ढोले बाबासाहेब बंडगर सचिव कार्याध्यक्ष शरद कांबळे उपाध्यक्ष सचिन गेजगे बरकत तांबोळी खजिनदार शिवाजी दिघे संघटक मधुकर सरगर सहसचिव तात्यासाहेब शिंदे प्रसिद्धीप्रमुख मयूर विटेकर सदस्य मोहन जाधव जगदीश ऐवळे व वामन कोळेकर यांची एकमताने निवडी करण्यात आल्या त्यांना निवडीचे पत्र राज्याध्यक्ष मोहन लामकाने यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिनकर खंडागळेमारुती गाडी मायाप्पा भजनावळे जावेद पटेल वामन कोळेकर अंकुश फुले नागनाथ बनसोडे तानाजी तोरणे व सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते