तुमची श्रीमंती समुद्रासारखी नकोआहे पण तुमची श्रीमंती तळ्यासारखी पाहिजे. ह.भ.प.संस्कार महाराज खंडागळे

जवळे(प्रशांत चव्हाण) तुमची श्रीमंती समुद्रासारखी नको आहे तुमची श्रीमंती तळ्यासारखी पाहिजे पैसा नसून सुद्धा माणसे तुमच्याजवळ असतात ती माणसे तुमची होतात. एक वेळ पैसा कमी कमवा कमवा पण माणसे कमवायला शिका संत तुकाराम महाराज यांच्या चार चरणातील अभंगाचे वर्णन करताना महाराज म्हणतात आपण देवाची भक्ती किती करतो हे महत्त्वाचे नसून आपली भक्ती देवाला आवडली का हे महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे डोळे भरून पंढरी पाहिल्यावर तुमच्या जन्माचे पाप निघून जाते.असे मौलिक विचार बाल कीर्तनकार ह.भ.प.संस्कार महाराज खंडागळे यांनी जवळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवात व्यक्त केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले चंद्रभागेच्या नदीतील संत पुंडलिकाचे दर्शन घेतल्यावर सर्व संतांचे दर्शन आपोआप घडते. आयुष्यात चांगल्या माणसाला त्रास आहे आहे वाईट माणसाला अजिबात नाही.महाराज म्हणतात देवाकडे मागण्यासाठी मंदिरात जाऊ नका देवाने तुम्हाला भरभरून दिले आहे यासाठी तुम्ही मंदिरात जावा. देव हा बुद्धीने भेटत नसतो पण देव हा हृदयाने भेटत असतो.तुम्ही भक्ती अशी करा अशी ती देवाला आवडली पाहिजे.झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो असे सांगत महाराजांनी उपस्थित भाविकांना श्रवणीय कीर्तनाचा आनंद दिला.
महाराजांचा सत्कार  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.या कीर्तनामध्ये गायक,मृदंगमणी, विण्याचे सेवेकरी, टाळकरी चोपदार यांची मोलाची साथ लाभली. तत्पूर्वी पहाटे काकडा सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन सायंकाळी प्रवचन हरिपाठ हे कार्यक्रम संपन्न झाले. वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी श्री. चंद्रकांत सुतार,श्री.दीपक चव्हाण,श्री.रमेशआप्पा साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button