विद्यापीठ कुस्ती कबड्डी स्पर्धेत विज्ञान महाविद्यालयाचे यश

दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2022 रोजी के एन भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत पुरुषांच्या व महिलांच्या कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या जवळजवळ पुरुषांचे दीडशे होऊन अधिक स्पर्धकांनी या मध्ये भाग घेतला तर चाळीसहून अधिक महिला खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये विज्ञान महाविद्यालयाची महिला कुस्ती खेळाडू कुमारी स्नेहल तानाजी देवकते Bsc भाग 1 हिने 57 ते 59 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मिळवला तर बी ए भाग 3 च्या वर्गात शिकत असलेला श्री लक्ष्मण बाळासो वाघमोडे याने 55 ते 60 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मिळवला.
राणी दुर्गावती विश्वविद्यालय जबलपूर मध्य प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी मुले स्पर्धेसाठी एम ए भाग 1 च्या वर्गात शिकत असलेल्या श्री प्रदीप सिद्धेश्वर भगत याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर कबड्डी संघात निवड झालेली असून तो आजच सराव शिबिरात भाग घेण्यासाठी अकलूज कडे रवाना झाला.
वरील सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रघुनाथ फुले व डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी लवटे सर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावर सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले