महाराष्ट्र

उत्कृष्ट शाळा” पुरस्कार प्राप्त राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार समारंभ.      

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी समृद्धी स्पोर्ट्स क्लब, सोलापूर व सोलापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे आयोजित केलेल्या सन २०२४-२५ या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपद पटकाविले. त्यामध्ये विद्यार्थ्यीनी कुमारी सुकन्या आप्पासाहेब व्हळगळ हिने गोळा फेक या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर कुमारी महेश्वरी महादेव बंडगर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अनिकेत शेषाप्पा दबडे याने 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला

 

 त्याचप्रमाणे श्री अंबिका देवी यात्रा महोत्सव कमिटी, सांगोला यांचे तर्फे सांगोला यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या ३ किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी कुमारी प्रजवली प्रकाश चौगुले हिने द्वितीय क्रमांक तर कुमारी सुकन्या आप्पासाहेब व्हळगळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. वरील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह राजुरी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती, राजुरी यांच्या वतीने शाळेच्या प्रांगणात यथोचितपणे भव्य सत्कार करण्यात आला. तसेच शाळेस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, उपशाखा सांगोला या संघटनेच्या वतीने “उत्कृष्ट शाळा” पुरस्कार नुकताच आमदार डॉ. श्री बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते व संघटनेच्या राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, राजुरी व ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर नामदेव करांडे व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती सुतार , उपाध्यक्ष गोपीनाथ दबडे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. सदरच्या सत्कार समारंभाप्रसंगी राजुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री महेश काटे, आप्पासाहेब व्हळगळ, शेषाप्पा दबडे, शरद पाटील, डॉक्टर महादेव बंडगर, दत्ता खुळे, रामभाऊ माने, औदुंबर सुतार, भाऊसाहेब जुजारे, प्रवीण खुळे हे सन्माननीय ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर करांडे सर, श्री सुभाष भोसले सर, श्री विजयकुमार जावीर सर, श्री दिनेश गव्हाणे सर, श्रीमती कस्तुरा पाटील मॅडम, श्रीमती विमल येडगे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुखदेव लवटे सर यांनी प्रभावीरीत्या केले तर आभार प्रदर्शन श्री संभाजी पवार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती, राजुरीच्या व ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button