महाराष्ट्र
सांगोला येथे श्री संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न..

सांगोला शहरात श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था सांगोला यांच्या वतीने सर्व रोग तपासणी, निदान व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तसेच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव श्री यश राजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी श्री यश राजे साळुंखे पाटील यांनी संत गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था सांगोला यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून संत रविदास महाराज यांचे अनमोल विचार आजही मार्गदर्शक असल्याचे सांगत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष व माजी तहसीलदार श्री संजय खडतरे यांनी केले.

या शिबिरामध्ये १३९ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदान शुगर थायरॉईड इसीजी तसेच थंडी ताप खोकला सर्दी इत्यादी सारख्या आजारांची तपासणी करून संबंधित रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले व स्पंदन स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व स्टाफ कडून मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था सांगोला या संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच सर्व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले…



