महाराष्ट्र

विभागीय सि -झोन क्रीडा स्पर्धेत फॅबटेक पॉलिटेक्निकने फडकवला मानाचा झेंडा 

सांगोला: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या विभागीय सि -झोन मैदानी स्पर्धेत फॅबटेक पॉलिटेक्निक मधील मुलींनी विविध क्रीडा प्रकारात नेत्र दीपक कामगिरी केली आहे.शेळवे येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा प्रकारात कु.सृष्टी मोरे या विद्यार्थिनीने लांब उडी क्रीडा प्रकारात विजेते पद पटकावले केले.तसेच तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात तिने उपविजेते पद मिळवले. कु.साक्षी मेटकरी याविद्यार्थिनीने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कु.सलोनी येलपले या विद्यार्थिनीने थाळी फेक या क्रीडा प्रकारात उपविजेतेपद पटकावले.

 

 

फॅबटेक पॉलिटेक्निकचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.बिरा वगरे यांच्या प्रोत्साहनात्मक मार्गदर्शनामुळे या वर्षी फॅबटेक मधील मुलींना नेत्रदीपक यश प्राप्त झालेआहे.त्याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर यांनी क्रीडा मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर , कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे ,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button