मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील नवनाथ पाटील यांचा ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा.

सांगोला ( प्रतिनिधी)-मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला तालुक्यातील गायगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी सदस्य व तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे तालुक्यामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
नवनाथ पाटील हे मराठा समाजाचे तरुण उद्योजक आहेत त्यांनी मराठा समाजासाठी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
ग्रामपंचायत सदस्य पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये आरक्षणासाठी राजीनामा देण्याची सुरुवात झाल्याची दिसून येत आहे.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण न मिळाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे नवनाथ पाटील यांनी सांगितले आहे.