सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गुरव समाजाच्या तरुणाचं आमरण उपोषण

पाचेगांव खुर्द/प्रशांत मिसाळ:
सध्या राज्यात सगळीकडेच जरांगे पाटलांच्या उपोषणाचे लोण पसरले आहे. संपूर्ण मराठा समाजसह इतर समाज मनोज जरांगे पाटील यांच्या ठामपणे पाठीशी उभा असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील बहुसंख गावात मराठा समाजाकडून साखळी व आमरण साखळी उपोषण चालू झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठे उपोषणाला बसल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे परंतु पाचेगांव खुर्द येथे सर्व समाज मिळून मिसळून नांदतो याचा प्रत्यय आला. शनिवार दि 28 तारखेपासून पाचेगांव खुर्द येथे आमरण साखळी उपोषण चालू आहे. परंतु काल सोमवार दि. 30 रोजी गावातील गुरव समाजाचे विष्णुपंत निळकंठ हा गुरव समाजाचा तरुण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण साखळी उपोषणाला बसला आहे.

विष्णुपंत निळकंठ हे गावातील गुरव समाजाचे कार्यकर्तृत्व तरुण आहेत. गावातील सर्व मंदिराची पूजाअर्चा आणि देवाची सर्व भक्तिमय सेवा करतात. त्यांनाही वाटत की मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचीही मुलं शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी काल सोमवार दि. 30 रोजी पूर्ण दिवसभर मौनवृत करून अन्न पाणी न घेता आमरण उपोषण करून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत कल्पेश महाराज यादव आणि सूरज बबन मिसाळ यांनीही यावेळी उपोषण केले. सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी यांच्याकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!