कोळे येथे रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांचा समाधी सोहळा संपन्न…
अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो भावीक भक्तांची उपस्थिती

सांगोला तालुक्यातील कोळा येथील कोळेकर महाराज मठाचे ३० वे मठाधिपती श्री श्री श्री १०८ रुद्रपशुपती कोळेकर महाराज शिवैक्य झाल्याने त्यांचा समाधी कार्यक्रमास काशीचे जगद्गुरु मलिकार्जुन शिवाचार्य यांच्या उपस्थितीत तसेच ३१ वें मठाचे मठाधिपती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी लहान महाराज यांच्या नियोजना खाली विविध विधी करून भस्म समाधी विधी सोहळा भक्तिमय वातावरणात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुरुराज माऊली ओम नमः शिवाय या जयघोषित समाधी सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास काशीचे प्रसिद्ध असलेले जगद्गुरु मलिकार्जुन शिवाचार्य, वाळवेकर महाराज, मासुरलीकर महाराज बेळंकीकर महाराज, महादेव महाराज, धारेश्वर महाराज, वेळापूर कर महाराज, वाईकर महाराज, सिद्धगिरी महाराज, माडेकर महाराज यांच्यासह गोवा राज्याचे मा उपमुख्यमंत्री आ चंद्रकांत (बाबु) कवळेकर, शेतकरी कामगार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख,माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शिवसेनेचे सागर पाटील, भाजपचे नेते श्रीकांत देशमुख नगरसेवक विष्णू माने, अध्यक्ष तानाजीराव पाटील, कवठेमंकाळचे प्रसिद्ध डॉक्टर विशाल मोहिते उद्योगपती गिरीश भाऊ नष्ट यांच्यासह आदी उपस्थित होते.
कोळा नगरीचे दैवत रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी शिवैक्य झाल्याने समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आंध्र या प्रदेशातून हजारोंच्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावली होती कोळेकर महाराज कोळा नगरीचे आराध्य दैवत होते गावातील संपूर्ण गाव बाजारपेठ आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावातील दानशूर व्यक्तींनी चहा बिस्किटे पाणी केळी इत्यादी मोफत उपलब्ध करून दिले होते संपूर्ण गाव गावातील संपूर्ण घराघरातील नागरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहून त्यांनी गुरुमूर्तीचे अंतिम दर्शन घेत या सोहळ्यात हा सोहळा हा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी प्रसार माध्यमांनी व्यवस्था केली होती घरी बसूनही लोकांना मोबाईलवर पाहत येत होता सोहळा पाहतात येत होता येणाऱ्या अंतिम दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी गावातील युवक मंडळ सज्ज होते ठीक ठिकाणी त्यांनी पाणी चहा बिस्किटे केले इत्यादी उपलब्ध करून दिले होते मोफत महाराज यांचा सोहळा संपन्न झाला. येत्या २५ जून रोजी अकराव्या दिवशी तिसऱ्या दिवसाचा फुले वाहनाचा कार्यक्रम सोहळा होणार आहे नागरिकांनी उपस्थित राहावे असे सांगण्यात आले.हजारोंच्या संख्येने समाधी सोहळ्यास उपस्थित भक्तगण उपस्थित होते…
हिंदू धर्माचा या समाधी सोहळ्यात मुस्लिम समाजाने युवकांनी येणाऱ्या महास्वामीजींच्या दर्शनासाठी अंत्यविधीच्या सोहळ्याच्या दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तांना चहा बिस्कीट देऊन एक अनोखा उपक्रम राबवला गावामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य असल्याचे दर्शन सर्वांना घडून दिले दाखवून दिले..



