सावे माध्यमिक विद्यालयाची सानिका गावडे भालाफेक स्पर्धेत तालुक्यात द्वितीय व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. सानिका लवटे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक.

क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयातील सानिका शंकर गावडे हिने 17 वर्षे वयोगटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच 17 वर्षे वयोगट मुलांमध्ये 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत आयान आतार, रुपेश वाघमारे, सूर्यकांत पांढरे, वैभव माने या विद्यार्थ्यांनी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
17 वर्षे वयोगट लांब उडी स्पर्धेत वाघमोडे राजू आबासो यांने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत मुलीमध्ये14 वर्षे वयोगटातील शेळके अस्मिता, नलवडे वैभवी, बंडगर पुनम, शेळके सानिका या विद्यार्थिनींनी तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत विद्यालयातील सानिका लवटे हिने 17 वर्षे वयोगटात 61 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी व गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व गुणवंत खेळाडूंचा व क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने गुलाब फूल देऊन करण्यात आला.
सर्व यशस्वी व गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत शेंडगे , सचिव श्री मुरलीधर इमडे, खजिनदार श्री दिलीप सरगर, संचालक श्री दिलीप शेंडगे, श्री गंगाराम इमडे , श्री विठ्ठल सरगर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावे ग्रामस्थ यांनी केले.



