श्री. चौंडेश्वरी महिला मंचच्या नवरात्र उत्सवानिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
चौंडेश्वरी महिला मंच व कोष्टी समाज संघटना, सांगोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महिला मंच व पुरुष मंडळी यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिल लाटणे सर व सौ. तनुजा दौंडे यांनी केले. बक्षीस वितरणाच्या वेळी विविध कला गुणदर्शन असा छोटासा कार्यक्रमही घेतला. सौ. मंगल लाटणे यांनी खूप छान कविता सादर केली व व्यायाम व योगाबद्दल माहिती सांगितली. छोट्या मुलांनी सुद्धा कविता, गाणी सादर केले.
यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा व स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे :
पाककला स्पर्धा : सौ. निशा जयराम दौंडे , प्रथम क्रमांक, कल्पना मंगेश कुलकर्णी, द्वितीय क्रमांक, सौ. शिवानी विनय कांबळे, तृतीय क्रमांक, सौ. स्वाती अमर तारळेकर, उत्तेजनार्थ.
डान्स स्पर्धेत लहान गट कु. मनस्वी कुलकर्णी, प्रथम क्रमांक, चि. पियुष दौंडे, द्वितीय क्रमांक, कु. राजविका सपाटे, तृतीय क्रमांक.
मोठा गट : कु. स्वरांजली शेंडे, प्रथम क्रमांक, कु. वैष्णवी देशमुख, द्वितीय क्रमांक, कु. शरयू भंडारे, तृतीय क्रमांक.
रांगोळी स्पर्धा : सौ. रेश्मा प्रशांत दिवटे, प्रथम क्रमांक, कु. वैष्णवी सुधीर दौंडे, द्वितीय क्रमांक, सौ. मयुरी भूषण तारळेकर, तृतीय क्रमांक.
तसेच काही विशेष बक्षीसेही देण्यात आली. त्यात रांगोळी लहान गट : कु. रागिनी जठार व चि. केतन नागेश दाते. याचबरोबर लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. त्यातील विजेते पुढील प्रमाणे :
संगीत खुर्ची मुले : 1) गणेश देशमुख,2) ऋतुराज रसाळ, 3) आर्यन भंडारे,
संगीत खुर्ची मुली:-1) तृप्ती दौंडे,2) जान्हवी गायकवाड,3) श्रावणी पाटणे
लिंबू चमचा मुले:-1) वर्धन कांबळे,2) फैजल मंडल, 3) सार्थक दिवटे
लिंबू चमचा मुली:-1) दुर्वा दौंडे, 2) तृप्ती दौंडे, 3) सारा कांबळे
महिला संगीत खुर्ची:-1) पुनम राजमाने,2) स्नेहल रसाळ, 3) कोमल दिवटे
सर्व विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांनी या कार्यक्रमाची बक्षीसे दिली आहेत त्या सर्वांचे चौंडेश्वरी महिला मंच यांच्याकडून खूप आभार. विशेष करून यावर्षी एक छानसा उपक्रम घेतला. आरतीला येणाऱ्या महिलांनी रोज आपल्या नावाची चिठ्ठी आणायची आणि तिथल्या बॉक्समध्ये टाकायची. त्यातून शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ काढण्यात आला व जे विजेते असतील त्यांना देवीला नेसलेल्या साड्या भेट म्हणून देण्यात आल्या. श्री. चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, श्री. चौंडेश्वरी महिला मंचच्या पदाधिकारी व संचालिका, श्री. चौंडेश्वरी नवरात्र उत्सव कमिटी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.