सांगोला तालुका

सांगोला महाविद्यालयात प्रोफाउंड एज्युटेक, पुणे या कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न

सांगोला / प्रतिनिधी – सांगोला महाविद्यालात प्रोफाउंड एज्युटेक, पुणे या कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह
दिनांक ३१/१०/२०२३ रोजी संपन्न झाला.

या कॅम्पस ड्राईव्ह साठी सांगोला महाविद्यालयातील B.Sc.(ECS), B.Sc. (CS), BCA तृतीय वर्षाचे १९९ विद्यार्थी व फॅबटेक टेक्निकल कॅम्पस येथील कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग चे १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या ड्राईव्ह च्या
उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रा. सुर्यकांत पाटील (प्लेसमेंट ऑफीसर) यांनी प्रास्ताविक केले व त्यांनी
आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्याना प्लेसमेंट ड्राईव्ह चा उद्देश व कंपनी विषयी माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी श्री. नीरज आडे (sr. manager)
व संगणक विभागप्रमुख डॉ.राजकुमार ताठे यांनी श्री. गौरव दुर्गे (System Admin) यांचे
स्वागत केले.

 

तसेच संगणक विभागप्रमुख डॉ.राजकुमार ताठे यांनी आपल्या मनोगतात
विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर अभ्यासात सातत्य
व नियमित सराव आवश्यक आहे असे कथन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश
भोसले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व ॲप्टीटयुड टेस्ट साठी
शुभेच्या दिल्या. दरम्यान श्री. नीरज आडे यांनी आपल्या प्री प्लेसमेंट टॉक मध्ये प्रोफाउंड या
कंपनी विषयी सविस्थर माहिती दिली तसेच रिक्रुटमेंट प्रोसिजर समजावून सांगितले. सदरील
ड्राईव्ह साठी 214 विद्यार्थ्यांनी ॲप्टीटयुड टेस्ट दिली व त्यांचा निकाल प्रतीक्षेत आहे.
सदर कार्यक्रमासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित
होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!