सांगोला विद्यामंदिरमध्ये संस्थाअध्यक्ष नुतनीकरण कार्यालयचे उद्घाटन संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या नुतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन नरेंद्र होनराव, अजिंक्य झपके व दत्तात्रय देशमुख यांचे हस्ते संपन्न झाले.
नुतन कार्यालयाचे विधिवत पुजन करून अजिंक्य झपके यांचे हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते , पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार , बिभीषण माने व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.