सांगोला तालुका

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा हीच विठ्ठलाकडे मागणी- फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्रीविठ्ठलाची महापूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला, हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या.

कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ. कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापुजा केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महापुजेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भाविकांना रांगेत जास्त वेळ लागणार नाही, भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याचा विचार आम्ही आराखडा तयार करताना करत आहोत. त्या पद्धतीने कामे करण्यात येतील. तिरुपतीला गर्दी काळात पण दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागतेच. यामुळे भाविकांना जो पॅटर्न सोयीचा आहे, तो पॅटर्न आम्ही पंढरपूरला राबवू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!