रोटरी क्लब ऑफ़ सांगोला तर्फे डॉक्टर्स डे,सी.ए डे व फार्मर्स डे साजरा..

1 जुलै पासून दर वर्षी रोटरी क्लबच्या नविन वर्षाची सुरुवात होत असते…या वर्षी रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे नूतन अध्यक्ष श्रीपती आदलिंगे व नूतन सचिव विजय म्हेत्रे यांच्या कार्याचा प्रारंभ विविध प्रकारच्या दिनविशेषाच्या कार्यक्रमाने झाला..1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून व सी.ए.डे म्हणून साजरा केला जातो..त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सन्मानार्थ कृषीदिन म्हणून देखिल साजरा केला जातो..म्हणून सांगोला शहरातील डॉक्टर्स,प्रगतीशील शेतकरी व सी.ए.यांचा सत्कार करण्यात आला..
या वेळी डॉ.प्रभाकर माळी,डॉ.अनिल कांबळे,डॉ.मछिंद्र सोनलकर, डॉ.सचिन गवळी,डॉ.राजेंद्र जानकर, डॉ.संतोष पिसे, डॉ महादेव कोळेकर डॉ.शिवराज भोसले,डॉ.इरफान तांबोळी,डॉ.संदीप देवकते व डॉ.मेघना देवकते यांचा रोटरी क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला…त्याच प्रमाणे सी.ए.पैकी उत्तम बनकर ,ओम उंटवाले,.जुबेर मुजावर ,तुषार ढेरे यांचा सत्कार करण्यात आला..फार्मर्स डे म्हणून रोटरी सद्स्य महेश गवळी व डॉ.प्रभाकर माळी याना शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले..
सी.ए उत्तम बनकर ,डॉ.तांबोळी यानी सत्कारा ब्द्द्ल आभार मानले..प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी डॉक्टर्स डे,सी.ए.डे व फार्मर्स डे ब्द्द्ल विवेचन केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो विजय म्हेत्रे यांनी केले सूत्रसंचालन इंजि.मधुकर कांबळे व आभार प्रदर्शन अध्यक्ष श्रीपती आदलिंगे यानी केले..या प्रसंगी रोटरी सद्स्य इंजि विलास बिले इंजि अशोक गोडसे,शरणाप्पा हळ्ळीसागर, रो अरविंद डोंबे गुरुजी उपस्थित होते..



