बहुचर्चित महूद – सांगोला रस्ता काँक्रीटकरण करणे कामाचा भूमिपूजन शुभारंभ

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला महूद हा रस्ता लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी आमदार शहाजी बापू पाटील हे मला सतत फोन करून पाठपुरावा करीत होते. मी आणि बापूंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून हा काँक्रीट रस्ता विविध सुविधेसह मंजूर करून घेतला . या काँक्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होताना मला मनस्वी आनंद होत आहे यापुढे सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत सुमारे १२५ कोटी रुपये खर्चून नव्याने तयार होणा-या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच.९६५ जी अंतर्गत महूद – सांगोला २४ किमी लांबीच्या रस्ता काँक्रीटकरण करणे कामांचा भूमिपूजन शुभारंभ निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमास बाबुराव गायकवाड,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, नवनाथ पवार,तानाजी पाटील , संभाजी आलदर,दादासाहेब लवटे,मधुकर बनसोडे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर , अतुल पवार, सरपंच दादासाहेब घाडगे, सागर पाटील, अभिजीत नलवडे, दिग्विजय पाटील , संजय मेटकरी ,समीर पाटील,खंडू सातपुते, शिवाजी घेरडे, जगदीश पाटील, विलास व्हनमाने, राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता अनिस खैरादी , कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि विनोद शिंदे आदी उपस्थित आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले , सांगोला महूद रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी नागरिकांसह सामाजिक संघटनेने उपोषणे,रस्ता रोको , खड्ड्यात वृक्षारोपण अशी अनेक प्रकारे आंदोलने झाली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रवासी वाहनधारकांसह नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा अत्यंत त्रास सोसावा लागला आहे. त्यादृष्टीने कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठेकेदारांने या काँक्रीट रस्त्याचे दर्जेदार काम करून येत्या दिवाळीपर्यंत हा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक दादासाहेब लवटे यांनी केले तर आभार कृष्णा कंट्रक्शन च्या वतीने मानले.
सुमारे १२५ कोटी रुपये खर्चून नव्याने तयार होणा-या महूद-अकलूज मार्गावर महूद, वाकी-शिवणे चिंचोली तलावाजवळ पूल असे तीन मोठे पूल उभारण्यात येणार असून, महूद गावाजवळ, निरा उजवा कालव्यावर साखर कारखान्याजवळ व शिवणे येथे असे तीन छोटे पूल बांधले जाणार आहेत.या मार्गावर महूद,वाकी,शिवणे,सांगोला हद्दीत एकूण २.१५५ की.मी. लांबीचे गटार बांधण्यात येणार आहे तसेच महूद येथे २, महूद हॉस्पिटल,साखर कारखाना,वाकी, शिवणे,चिंचोली फाटा,सांगोला असे एकूण ९ प्रवाशी निवारा शेड उभारले जाणार आहेत.