शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था,सांगोला (रजि.) यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

सांगोल्यातील ध्यास जनसेवेचा या ब्रीद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या वतीने रविवार दिनांक 26/ 11/ 2023 रोजी शहीद दिन व संविधान दिनाचे औचित्य साधून व संस्थेचा चौथा वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष महिमकर यांनी दिली आहे.
नेहरू चौक, सांगोला व नगर परिषद समोर येथे रविवारी सकाळी नऊ ते सहा या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे आयोजन मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करण्यासाठी आयोजन केले आहे या कार्यक्रमात माजी सैनिक, वीर पत्नी यांचा विशेष सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे..
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी सांगोला शहरातील देश प्रेमी नागरिकांनी नेहरू चौक सांगोला येथे रक्तदान करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या व रक्तदान शिबिराच्या माहितीकरता मो.7620657112,8446236642 यांच्याशी संपर्क साधावा..