चोरट्यांनी फोडले जवळा ग्रामपंचायत कार्यालय; 29 हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगोला(प्रतिनिधी):-अज्ञात इसमाने ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करुन
लाकडी टेबल, एक खुर्ची व सीसीटीव्ही चा डिव्हीआर असा 29 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवून नेला असल्याची घटना जवळा ता.सांगोला येथे घडली.
10 हजार रुपये किंमतीचा लाकडी टेबल, 10 हजार रुपये किंमतीची व्हिल खुर्ची व 9 हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असून चोरीची फिर्याद ग्रामसेवत दत्तात्रय रसाळ यांनी दिली आहे.
ग्रामसेवक रसाळ हे 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालय बंद करुन गावी गेलेले होते. दि.25 नोव्हेंबर रोजी सकाळी 08.15 वाजता ग्रामपंचायतचे शिपाई जयश्री वासते यांचा मुलगा समाधान वासते यांनी सांगितले की, जवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेरील दरवाजाचे कुलप तोडलेले दिसत आहे. तेव्हा त्यांनेे आतमध्ये जावून पाहून सांगितले की, कार्यालयातील लाकडी टेबल, गोल आकाराची खुर्ची व सीसीसीटीव्ही. डिव्हीआर इत्यादी साहित्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्वत: ग्रामसेवक रसाळ व पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जावून पाहिले असता लाकडी टेबल, व्हिल खुर्ची व सीसीटीव्ही डिव्हीआर चोरीस गेला असल्याचे दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद केले असून आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.