कोळा परिसरात घरोघरी तुलसी विवाहाचे बार लग्नसराईला धडाक्यात प्रारंभ…

सांगोला तालुक्यातील कोळा परिसरात हिंदू पंचांगानुसार तिथी व शुभमुहूर्तावर कार्तिक शुध्द व्दादशीला आली लग्न घटिका समीप गंगा यमुना गोदावरी नर्मदा आदी मंगलाष्टकांच्या संस्कारात विधीवत पूजा व पारंपारिक पध्दतीने शुक्रवारी तुलसी व श्रीकृष्ण यांचे शुभला पार पडले.तुलसी विवाहाने या वर्षीच्या लग्रसराई हंगामाला धडाक्यात प्रारंभ झाला. कुटुंबातील सदस्य, मित्र- परिवार व शेजाऱ्यांसह घरोघरी तुलसी विवाहाचे बार उडाले असून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ही लगीनघाई सुरुच राहणार आहे.
असल्याने तुलसी विवाहासाठी मोठ्या उत्साहात घरोघरी तयारी करण्यात आली होती. उसाचा मंडप, नक्षीदार रांगोळी, फुलांची आकर्षक सजावट, वन्हाडींची लगबग अशा धामधुमीत तुलसी विवाहाला प्रारंभ झाला. पौर्णिमेपर्यंत हा सोहळा चालणार असल्याने तुलसी विवाहाचा उत्साह पुढील काही दिवस कायम राहणार आहे.कोळे बाजारपेठेतही तुलसी विवाहसाठी लागणाऱ्या वस्तू व पूजा साहित्याची रेलचेल वाढली असून मणि मंगळसूत्र, फणो, कापसाची माळ, बांगड्या श्रीकृष्णासाठी जानवे, मुकुट, पूजेचे पाट, रुमाल आदी साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली.
तुळशीच्या लग्रासाठी उसाचा मंडप घालण्याची परंपरा असल्याने ऊस, देशी बोरं, चिंच, झेंडूची फुले आवळ्यालाही मागणी वाढली होती. सायंकाळी उशीरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.दिवाळीचा माहोल कायम अनेकांनी प्रारंभीच आपल्या अंगणात पवित्र मंगलाष्टकांच्या सप्तसूरांमध्ये तुलसी विवाह पार पाडला, कार्तिकी द्वादशीला तुलसी विवाहास प्रारंभ झाला असला तरी प्रत्येकजण आपापल्या सोयीने सोहळा साजरा करणार आहे.