दिमाखदार सोहळ्यात ठोंबरे कुटुंबीयाच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन..

सांगोला- एकाच कुटुंबात मायलेकरांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणे,ही दुर्मीळ गोष्ट असुन तो योग प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी घडवून आणला आहे..तबल्याचया रचनांची उगमस्थाने हे पुस्तक व मनिषा ठोंबरे यांच्या काव्यपूर्ती या कविता संग्रहाचे प्रकाशन एकाच दिवशी व एकाच व्यासपीठावर झाले…त्या वेळी शुभेच्छा देताना प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके बोलत होते..कविता सुचणे,लिहिणे या दैवी गोष्टी असुन त्या साठी माता सरस्वतीचा आशिर्वाद लागतो..तो आशिर्वाद व भाग्य मनिषा ठोंबरे व संकेत ठोंबरे याना मिळाला असुन त्यांच्या हातून अनेक पुस्तके व काव्यसंग्रह लिहिले जावेत,अशा शुभेच्छा त्यानी यावेळी दिल्या..सांगोला शहरातील अकलूज रोडवरिल कविराज मल्टीपर्पज हॉल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात संकेत ठोंबरे लिखित तबल्याच्या रचनांची उगमस्थाने या पुस्तकांचे व मनिषा ठोंबरे लिखित काव्यपूर्ती या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले,त्या वेळी प्रा.झपके बोलत होते..सदर दोन्ही पुस्तके पलपब पब्लिकेशन अहमदाबाद,शाखा कराड यानी प्रकाशित केली असुन ती अमेझोन वर उपलबध आहेत.. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ.संजीवनी केळकर होत्या.या प्रसंगी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ड़ौ.कृष्णा इंगोले,गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर,चैतन्य सांगित विद्यालयाचे संचालक प्रसाद पाटील यांचे सह माता- बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी,सांगोला शहरातील कवी व साहित्यिक उपस्थित होते..
डॉ कृष्णा इंगोले यानी शुभेच्छा देताना सांगितले की सांगोला शहरातील महिला आता लेखन क्षेत्रात मुशफिरी करू लागल्या असुन पुष्पलता मिसाळ,प्रा.निलिमा कुळकर्णी यांच्या पाठोपाठ मनिषा ठोंबरे यानी सांगोलयतील कवयत्रीच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे..त्यांच्या कवितेत सण ,समरम्भ,व्रत वैकल्ये,निसर्ग,शेतकरी,देशभक्ती,नातेसंबंध,या सह सर्व क्षेत्राला प्राधान्य दिले असल्याने त्यांचा काव्यसंग्रह परिपूर्ण झाला आहे…गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर यानी कुटुंबप्रमुख कसा असावा हे सांगताना प्रा.राजेंद्र ठोंबरे यांच्या धडपडीमुळे व प्रेरणेमुळे मनिषा व संकेत या मायलेकराचा पुस्तक प्रकाशन सोहळा एकाच दिवशी,एकाच वेळी व एकाच व्यासपीठावर होत असुन हा सांगोलयाच्या साहित्य क्षेत्रातील दुर्मीळ योग असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या..प्रसाद पाटील यानी संकेतने लिहिलेल्या तबल्याचया पुस्तकाची माहिती देवुन हे पुस्तक प्राथमिक तबला अभ्यासकाना उपयुक्त असल्याचे सांगितले…या प्रसंगी माता- बालक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा.निलिमा कुलकर्णी,म.सा.प चे कार्यवाह प्रा.धनाजी चव्हाण यानी मनोगत व्यक्त केले..डॉ.कृष्णा इंगोले यानी नविन साहित्यिकाना प्रेरणा देवुन लेखनासाठी प्रवृत्त करावे,अशी अपेक्षा कवी सुनिल जवन्जाळ यानी व्यक्त केली…ह.भ.प.सुभाष लवूळकर,पुष्पलता मिसाळ,डॉ.शालिनी कुलकर्णी,ड़ौ.प्रभाकर माळी,वसुंधरा कुलकर्णी यानी शुभेच्छा दिल्या…
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली..स्व.महेश जवळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण व 50 व्या जयंती निमीत्त भगिनी मनिषा ठोंबरे यानी त्यांचा काव्यसंग्रह स्वर्गवासी बंधू व वडीलाना श्रद्धांजली म्हणून अर्पण केला.त्या प्रित्यर्थ प्रतिमा पूजन करण्यात आले…मातृशक्तीचा सन्मान म्हणून मातोश्री श्रीमती मंगळ जवळेकर यांचा सत्कार करण्यात आला..सर्व उपस्थित मान्यवराना.पुस्तकभेट व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला…कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी केले..सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यानी तर आभार प्रदर्शन कु.रुद्राणी ठोंबरे यानी केले..या शानदार सोहळ्यास शहर व परिसरातील साहित्यिक,लेखक,पत्रकार,नवोदित कवी,महिला यानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती..
ठोंबरे परिवारातिल ज्येष्ठ सद्स्य पुणेस्थित विलास ठोंबरे यानी या वेळी माता- बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेस रू.एक लक्षची ठेव मातोश्री स्व.मालती मधुसुदन ठोंबरे यांच्या स्मरणार्थ ठेवली…गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून या रकमेच्या ठेवीवरिल व्याजाचा उपयोग व्हावा,अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली…



