सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

*शहरवासीयांच्या समस्यांसाठी शेकाप पक्षाने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

सांगोला, प्रतिनिधी : सांगोला शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरवासीयांच्या समस्यांबाबत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना निवेदन दिले आहे.

शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगोला शहरात गेल्या काही दिवसापासून अस्वच्छ व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांना स्वच्छ व नियमित पुरेसा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच शहरातील अनेक भागामध्ये गटारीची स्वच्छता नसल्यामुळे डासांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. या डासांमुळे शहरात डेंगू, चिकनगुनिया सारख्या आजारांचे रुग्ण सतत वाढत आहेत. यासाठी गटारींची स्वच्छता व नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. गुंठेवारी नियमितता प्रकरणे गतिमान करण्यात यावीत. शहरातील काही ठिकाणी गवत व झाडे-झुडपे वाढले आहेत. अशा ठिकाणी काही विषारी सर्प आढळून येत आहे. शहरात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या गोष्टीची दखल घेऊन शहरवासीयांच्या समस्या लवकर दूर कराव्यात असे निवेदन मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांना देण्यात आले आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख, ॲड. भारत बनकर, रमेश जाधव, सुरेश माळी, राजू मगर, दीपक चोथे, मधुकर कांबळे, औदुंबर सपाटे, रफिक तांबोळी, निहाल तांबोळी, बापू ठोकळे, रफिक इनामदार, अजित गावडे, किशोर बनसोडे, दीपक बनसोडे, रामचंद्र ढोबळे, राजू मदने, बाबासाहेब बनसोडे, नागेश तेली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या मागण्यांचे कार्यवाही लवकरात लवकर व्हावी. शहरवासीयांना स्वच्छ व उच्च दाबाने नियमित पाणीपुरवठा व्हावा व विशेषतः डासामुळे विविध आजारांना नागरिकांना तोंड द्यावी लागत आहेत. गटाऱ्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. या गोष्टीकडे नगरपालिकेने लक्ष दिले पाहिजेत. अन्यथा या बाबींकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे याबाबत निश्चितपणे आवाज उठविला जाईल असा इशारा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे.

* चौकट –
तुंबलेली गटार दाखवली मुख्याधिकाऱ्यांना -*
विविध मागण्याचे निवेदन डॉ. बाबासाहेब देशमुख व शेकाप पक्षातील विविध मान्यवरांनी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना दिले. निवेदन दिल्यानंतर त्यांनी थेट बस स्थानक शेजारील तुंबलेली गटार मुख्याधिकारी डॉक्टर गवळी यांना दाखविली. अशा गटारी तुंबल्या तर शहरात डास कसे वाढणार नाहीत ? शहरातील समस्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!