सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी वसंतराव दिघे तर सचिव पदी अभिमन्यू कांबळे यांची निवड

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेची बैठक सांगोला कार्यालयात वसंतराव दिघे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये सन 2024 ते 2026 साठी वसंतराव दिघे यांचे अध्यक्षपदी तर सचिव पदी अभिमन्यू कांबळे गुरुजी यांची निवड करण्यात आली.

सदर बैठकीत उपाध्यक्षपदी जयवंतराव नागणे व नामदेव भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी अरुण वाघमोडे व खजिनदार पदी गंगाराम इमडे तर संचालक पदी श्रीमती प्रतिभा शेंडे व अंबिका शिंदे सुनंदा चव्हाण दिनकर घोडके एकनाथ जावीर विलास नलवडे बापूसाहेब लवटे लक्ष्मण सावंत तर सहसचिव दत्तात्रय खामकर व सल्लागार म्हणून प्रभाकर कसबे सिद्धेश्वर झाडबुके निवृत्ती मिसाळ, लक्ष्मण सावंत व प्रसिद्धी प्रमुख म्हणून रविराज शेटे यांची निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीनंतर साने गुरुजी कथामाला व गुंडोपंत झाडबुके यांच्या स्मरणार्थ सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी यांच्या हस्ते नवीन कार्यकारणीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्यालय रंगरंगोटी शुशोभीकरण व नवीन सदस्य संघटनेत घेण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी मारुती काळे गुरुजी मुलानी गुरुजी साळुंखे गुरुजी नीलकंठ गुरुजी व इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!