शहीद जवान संस्थेच्या वतीने शिंदे कुटुंबास पिको फॉल मशीन भेट

पतीच्या निधनानंतर प्रपंचाची जबाबदारी पार पाडत असलेल्या अकोला येथील श्रीमती हर्षदा संजय शिंदे यांना शहीद जवान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पिको फॉल मशीन भेट देण्यात आली.
शिंदे वस्ती अकोला येथे सासरी राहत असलेल्या श्रीमती हर्षदा शिंदे यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले त्यानंतर संपूर्ण जबाबदारी श्रीमती हर्षदा शिंदे यांच्यावर आली त्यांना दोन मुली असून त्यांचा सांभाळ व त्यांचे शिक्षण त्या करत आहेत या कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय शहीद जवान संस्थेच्या वतीने बुधवार 24 जुलै 2024 रोजी अकोला येथे पिको फॉल मशीन भेट देण्यात आली.
यावेळी शहीद जवान संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले सचिव संतोष महिमकर खजिनदार महादेव दिवटे ,पांडुरंग कुंभार, संदीप पाटणे ,शरद शिंदे, बिरुदेव मासाळ आदीसह शिवाजी महादेव शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.