रूपाली चाकणकर यांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा: जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील

महाराष्ट्र तसेच देशाच्या अनेक राज्यांमधील शेतकरी वर्ग सम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या शेतामध्ये बळीचे पूजन करतो. इतिहास काळात या बरी बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारल्याचे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या गुलामगिरी ग्रंथात सिद्ध केले आहे. असे असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी 14 नोव्हेंबर 2023 रोजी फेसबुक या सोशल माध्यमातून प्रसारित केले होते.बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित तमाम शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी,कारवाई टाळण्यासाठी चाकणकर या आपल्या पदाचा गैरवापर करून दबाव टाकत आहेत.तरी प्रशासनाने रूपाली चाकणकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील यांनी सांगोला तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी विभागीय उपाध्यक्ष राजू मगर,तालुकाध्यक्ष विनायक शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दिघे,शहराध्यक्ष अनिल शिंदे,स्वराज्य संघटना प्रमुख विशाल केदार तालुका उपाध्यक्ष शरद गायकवाड, तालुका खजिनदार मल्हार गायकवाड, तालुका संघटक अण्णा राजे लेंडवे, संजय पपू लेंडवे कडलास,शहर कार्याध्यक्ष संदीप गिड्डे, शहर उपाध्यक्ष कौस्तुभ शिंदे यांनी केली आहे.