उद्या सांगोला बंद

सांगोला:-इंदापूर तालुका इंदापूर जि. पुणे येथे काही समाज कंठकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे निषेधार्थ सखल बहुजन समाज व गोपीचंद (शेठ) पडळकर प्रेमी यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सांगोला बंदची हाक पूकारण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे निषेधार्थ पुकारण्यात येणाऱ्या सांगोला बंद बाबत सखल बहुजन समाज व गोपीचंद (शेठ) पडळकर प्रेमी यांच्यावतीने पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बहुजन समाज बांधव व गोपीचंद पडळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर तालुका इंदापूर जि. पुणे येथे ओ बी सी बांधवांच्या मेळाव्यानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर हे या ओ बी सी मेळाव्यास उपस्थित राहणेकरीता इंदापूर मधुन मेळाव्याच्या दिशेने निघाले असता काही समाज कंठकांनी बहुजन नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर पडसात उमटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन या झालेला हल्ला निषेधार्थ आहे. म्हणुन या झालेल्या हल्ल्यामुळे सखल बहुजन समाजाच्या व आमदार गोपीचंद (शेठ) पडळकर प्रेमी यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. म्हणून झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणुन सखल बहुजन समाजाच्या व आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने उद्या शनिवार दि. १६/१२/२०२३ रोजी सांगोला बंद ठेवून या झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे.