नाझरे वझरे येथील श्री दत्त जयंती सप्ताह आजपासून प्रारंभ

नाझरे प्रतिनिधी:-श्रीधर दत्तानंद जुनाट मंदिराचे जीर्णोद्धारक व निष्काम सेवा अधिपती बाळ ब्रह्मचारी योगी श्री समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांचे आज्ञेनुसार 68 वा दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात दररोज गुरुचरित्र पारायण सकाळी सात ते अकरा तसेच 20 डिसेंबर बुधवार रोजी रात्री 7ते 9 ह भ प अंबादास करांडे महाराज पंढरपूर यांचे कीर्तन तर अहिल्यानगर जागर 21 डिसेंबर गुरुवार रोजी हभप आप्पा चव्हाण महाराज नाझरे यांचे कीर्तन तर संजीव आश्रम यांचा जागर 22 डिसेंबर शुक्रवार रोजी हभप एकनाथ महाराज सांगोलकर बलवडी यांचे कीर्तन तर अहिल्यानगर जागर 23 डिसेंबर शनिवार रोजी ह भ प रामहरी खंडागळे महाराज कोळे यांचे कीर्तन तर बुध्याळ जागर 24 डिसेंबर रविवार रोजी हभप परमहंस राजयोगी उद्धव महाराज कोळे यांचे कीर्तन तर संजीव आश्रम यांचा जागर 25 डिसेंबर सोमवार रोजी ह भ प धोंडीराम यादव महाराज वझरे यांचे कीर्तन तर अहिल्यानगर जागर 26 डिसेंबर मंगळवार रोजी श्री सद्गुरु संजीवादास महाराज यांचे शिष्य सुखदेव आधाटे यांचे सकाळी ठीक दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तन होईल १२ वाजता दुपारी पुष्पवृष्टी सोहळा संपन्न होईल. या दिवशी संजीव आश्रम भजनी मंडळ यांचा जागर असेल.
बुधवार 26 डिसेंबर रोजी दुपारी ठीक १२ वाजता दत्त जन्माची फुले पडतील व यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी चार वाजता श्री दत्त पालखीची भव्य दिव्य मिरवणूक श्री संजीव लेझीम मंडळ यांच्या मनमोहक नाच गाण्यांसह संपन्न होईल तसेच रात्री ठीक ९ वाजता शोभेची दारू काम करण्यात येईल.
सालाबाद प्रमाणे शुक्रवार 22 डिसेंबर रोजीचा आठवडे बाजार दत्त मंदिराकडे भरेल तसेच बुधवार 27 डिसेंबर रोजी कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. तरी या सप्ताह सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी आवश्य लाभ घ्यावा.