सांगोला तालुकाशैक्षणिक

सक्षम कार्यकर्ता हीच भाजपाची खरी ताकद – प्रशांत परिचारक

लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने सांगोल्यात सुपर वारियर्सची बैठक संपन्न

सांगोला (तालुका प्रतिनिधी): भाजपचे बुथस्तर व गावागावात पोहचलेले संघटन हे कार्यकर्त्यांच्या बळाचे फलीत आहे. पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या योजना व निर्णय हे कार्यकर्त्यांचे बळ देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील क्रांतीकारी कार्य पुन्हा एकदा आपल्याला जनतेसमोर न्यायचे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरा आयोजित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे. सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.

 

महाविजय २०२४ लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने सांगोल्यात सुपर वारियर्सची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रशांत परिचारक बोलत होते. यावेळी भाजपचे माढा लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, दुर्योधन हिप्परकर, डॉ.विजय बाबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, सुपर वारियर्स उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, भाजपची ध्येयधोरणे निश्चित करून कार्यकर्ते ती सामान्यांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे कार्यकर्ता हाच पक्षाची खरी ताकद आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथची ताकद ५१ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी वॅारिअर्सनी कामाला लागावे. भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारी आणि अपेक्षांची योग्य तो समन्वय साधावा. पक्षाची जबाबदारी सांभाळताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. पक्ष संघटन वाढीसाठी आणि बूथ सक्षमीकरणासाठी सुपर वारियर्स ही संकल्पना राबविण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी भाजपच्या
कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.

 

—————————-

बूथ, शक्ती केंद्र यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी वॅारिअर्स संकल्पना अस्तित्वात आली आहे. राजकीय क्षमता लावून ५१ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी वॅारिअर्सनी कामाला लागावे. ग्राम अध्यक्षांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. वेळोवेळी बैठका घेण्यात येतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वॅारिअर्सच्या टीमवर मोठी जबाबदारी आहे. 

राजकुमार पाटील, समन्वयक, भाजप माढा लोकसभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!