सावे माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा.

सांगोला तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सावे शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ सावे व सावे माध्यमिक विद्यालय सावे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर ,सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री शिवाजी वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य वसंत रड्डी, संतोष माने ,विकास इमडे ,पांडुरंग शेळके ,भारत शेजाळ ,धनाजी माने ,दयानंद शेळके व विद्यालयातील शिक्षक वृंद यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाढदिवसाचे औचित्य साधून वह्यांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी वाढदिवसानिमित्त शालोपयोगी वह्यांचे वाटप करण्यापाठीमागील उद्देश स्पष्ट करून त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊ देण्यात आला. वाढदिवसाच्या प्रसंगी विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व संगीत खुर्ची इत्यादी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत – प्रथम क्रमांक- वनिता बंडगर, द्वितीय क्रमांक- सरस्वती शेळके, तृतीय क्रमांक- नम्रता माने, उत्तेजनार्थ -साक्षी गावडे. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -ज्योती कांबळे ,द्वितीय क्रमांक- माया चव्हाण ,तृतीय क्रमांक- स्वप्नाली ननवरे व उत्तेजनार्थ -सुजल गावडे तर संगीत खुर्ची- प्रथम क्रमांक- सानिका कांबळे, समृद्धी देवकते व अंजली गावडे यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.