सांगोला तालुका

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न” 

म. फुले पब्लिक चँरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्या मा.प्रा.सौ.जयश्री पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते व महात्मा फुले पब्लिक चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.डॉ. प्रभाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

 

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या मा.प्रा.सौ.जयश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्री.गोविंदराव माळी, श्री. बनकर सर, श्री. विष्णू लांडगे, श्री.गजानन बनकर हे सर्व मान्यवर उपस्थित होते                  यावेळी कु.अक्षय वाघमोडे या माजी विद्यार्थ्यांची एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण होऊन कक्ष अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या वर्षाचा आदेश विद्यार्थी पुरस्कार कु.नितीन अजित राऊत व सावित्रीबाई फुले पुरस्कार कु.देविका सागर कदम यांना देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ.जयश्री पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतातून देव कोठे सापडतो ही गोष्ट सांगून मुलांचे मनोरंजन केले. फुलासारखे आनंदी आपले जीवन झाले पाहिजे असे विचार व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. प्रभाकर माळी  यांनी मुलांना चांगले संस्कार मिळाले पाहिजे व मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली पाहिजे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रास्ताविक श्री.बनकर सर यांनी केले. नंतर मधुकण या नावाचे विद्यार्थी हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

मंगळवार दिनांक २ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.सौ व श्री.महेंद्र दौंड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात देशभक्ती गीते, कोळी गीते,खंडोबाची गीते, शेतकऱ्या विषयक नाटक सादर करण्यात आले.सुत्रसंचालन सौ.मयुरी नवले मॅडम यांनी केले.

 

सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, फनी गेम्स घेण्यात आले. कार्यक्रम सुत्रसंचालन श्रीमती. सुलेखा केदार मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.अनिता माने मॅडम यांनी मानले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिपक वाघमोडे सर ,सौ.रजनी पलसे मॅडम,श्री विशाल होवाळ सर,सौ.जयश्री वाघमोडे मॅडम व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!