सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे सांगोला तालुक्यासाठी १ कोटी ५६ लाख ७५ हजार मंजूर : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील 

महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत जवळा ता सांगोला येथे विविध कामांसाठी १ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
या महामंडळ अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महुद अंतर्गत जवळा ता सांगोला येथील क्षेत्रावर १०० शेळ्यांच्या क्षमतेचा नवीन वाड्याचे बांधकाम करण्यासाठी ६० लाख, शेळ्या मेंढ्यांसाठी वैरण साठवणूक गोडाऊन तयार करण्यासाठी १० लाख ५० हजार रुपये, कार्यालय इमारत बांधकाम करण्यासाठी ११ लाख २५ हजार रुपये तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या एक अधिकारी वर्ग ३ चे एक कर्मचारी आणि वर्ग ४ चे ४ कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी ७५ लाख असे एकूण १ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असल्याची माहिती दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
मंजूर निधीतून तात्काळ या कामांना गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाईल तसेच या कामासाठी आणखी काही निधी आवश्यक असेल तर याबाबत पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणू असेही शेवटी माजी आमदार दिपकआबांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!