सांगोला तालुका

जवळे-आगलावेवाडी येथील श्री.म्हसोबा देव यात्रेस  सोमवारपासून प्रारंभ.; यात्रेत खिलारी जनावरांचे व शेतमालाचे जंगी प्रदर्शन.

जवळे(प्रशांत चव्हाण)जवळे-आगलावेवाडी येथील श्री.म्हसोबा देव यात्रेस सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी रिसीव्हर श्री.व्ही.बी जाधव यांनी दिली.
चालू वर्षाचा यात्रेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 ते बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 अखेर यात्रा संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी श्री.ची पूजा होईल तसेच मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 ते गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 पर्यंत शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 ते मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत खिलार जनावरांचा व सर्व प्रकारचा बाजार बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी श्री.च्या पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता होईल. यात्रेमध्ये भरपूर पाण्याची व विजेची व्यवस्था यात्रा कमिटीतर्फे करण्यात आली असून यात्रा कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यात्रेसाठी जागा वाटप सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू आहे. ज्या भाविकांना देवास देणगी रोख अगर वस्तुत रूपात द्यावयाची असेल त्यांनी सदर देणगी यात्रेचे  रिसीव्हर यांचेकडे देऊन रीतसर नोंदणी करून पावती घ्यावी.
श्री.व्ही बी जाधव रिसीव्हर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!