दीपकआबा साळुंखे- पाटील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बंडगर तर व्हाईस चेअरमनपदी  खबाले

महूद, ता. २० : सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी वसंत बंडगर यांची तर व्हाईस चेअरमनपदी कमल खबाले यांची निवड झाली आहे.

संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यासाठी सहाय्यक सहकारी अधिकारी अमर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.यावेळी चेअरमन पदासाठी वसंत बंडगर तर व्हाईस चेअरमन पदासाठी कमल खबाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अमर गोसावी यांनी जाहीर केले.यावेळी संस्थेचे संचालक कुमार बनसोडे,विलास डोंगरे,महादेव नागणे,संजय गायकवाड,माणिक मराठे,गोविंद भोसले,पल्लवी मेणकर हे उपस्थित होते.

निवडीनंतर चेअरमन वसंत बंडगर व व्हाईस चेअरमन कमल खबाले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी,विकास साळुंखे,जिल्हा संघाचे मार्गदर्शक रफिक मुलाणी,तालुका संघाचे अध्यक्ष मोहन आवताडे,विश्वंभर लवटे,तानाजी खबाले,उमेश महाजन,संस्थेचे सचिव अमर कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना  सुहास कुलकर्णी यांनी सांगितले की,जिल्ह्यात सर्वात कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणारी ही संस्था सभासदांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे.नूतन चेअरमन वसंत बंडगर म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन सभासदांच्या हिताचे पारदर्शक काम केले जाईल.यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मोहन अवताडे, व्हाईस चेअरमन कमल खबाले यांनीही विचार व्यक्त केले.गोविंद भोसले यांनी आभार मानले.

फोटो ओळ- सांगोला : येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत बंडगर व व्हाईस चेअरमन कमल खबाले यांचा सत्कार करताना मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button